ब्लूबेरी ओट्स | Blueberry Overnight Oats | Weight loss recipe | Easy Healthy Breakfast recipe

free weight loss ebook

आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय, पौष्टिक ब्लूबेरी ओट्स.

पाहुया ओट्स खाण्याचे काही जबरदस्त फायदे…
– उच्च रक्तदाब नियंत्रित
– मधुमेधावर गुणकारी
-हृदयरोगासाठी फायदेशीर
– बद्धकोष्ठतेपासून सूटका
– चमकदार त्वचा
– वजन कमी करण्यास मदत
– तणाव कमी करण्यास मदत

जिन्नस:
१/२ कप (४५ ग्राम) रोल्ड ओट्स
१ टेबल्स्पून चिया बिया
१/२ कप (४५ ग्राम) ब्लूबेरीज्‌
चिमूटभर मीठ
१/४ कप (७० ग्राम) ग्रीक दही
१-२ टीस्पून मध
१/२ कप (१२० मिली) बदामाचे दूध किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही दूध
शोभेसाठी कापलेले बदाम आणि ब्लूबेरीज्‌

कृती :
– काचेचा बाऊल घेऊन त्यात १/२ कप रोल्ड ओट्स टाकणे. त्यात चिमूटभर मीठ,१/२ कप ब्ल्यूबेरीज्‌,१ टेबलस्पून चियाच्या बिया ,१/२ कप बदामाचे दूध ,१/४ कप ब्ल्यूबेरी ग्रीक दही,१ टेबलस्पून मध हे सर्व बाऊलमध्ये घालून एकत्र ढवळणे.
– हे मिश्रण काचेच्या ग्लासात ओतून कमीतकमी ४ तास अथवा रात्रभर फ्रिज मध्ये ठेवणे.
– ४ तासानंतर अथवा दुसर्‌या दिवशी सकाळी ग्लास बाहेर काढून त्यावर ब्ल्यूबेरीज्‌ व बदामाचे बारीक काप लावून सजवणे.

टिप :
– आपल्या आवडीनुसार मध घालावे.
– मधाच्या ऐवजी आपण मैपल सिरप वापरु शकता.
– तुम्ही घरी बदामाचे दूध बनवू शकता. बदामापासून दूध काढायची पध्दत ही नारळापासून दूध काढण्‌यासारखी आहे.

#overnightoats
#overnightoatsrecipe
#overnightblueberryoats
#oatsforweightloss
#howtoloseweightfastwithoats
#oatsrecipes
#oatsrecipeforweightloss
#easybreakfastrecipes

Post Author:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.